पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशन यांच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. उन्नती सोशल फाऊंडेशन, आनंद हास्य क्लब, परफॉर्मिंग आर्टस् अँड वेलनेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन रोज आयकॉन कमर्शियल कॉम्प्लेक्स, कुणाल आयकॉन रोड, पिंपळे सौदागर येथे करण्यात आले होते.
जेष्ठ नागरिकांच्या सह तरुणांची संख्या देखील या उपक्रमाला अधिक होती. परफॉर्मिंग आर्टस् अँड वेलनेस अकॅडमीच्या योग शिक्षकांमार्फत योगासनांची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. कार्यक्रमाला संबोधित करताना उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या, “प्राचीन भारतीय परंपरेत योग साधनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सक्षम आणि सशक्त भारताच्या निर्मितीसाठी आपल्या प्राचीन योगसाधनेचे आपण पुनर्जीवन करत आहोत. पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी साहेबांच्या संकल्पनेतून पुढे आलेला आंतरराष्ट्रीय योग दिन हे संपूर्ण जगाला भारताच्या प्राचीन आणि उज्ज्वल परंपरेची दखल घ्यायला लावत आहे. अबाल वृद्धांच्या सह प्रत्येकाने योग साधना अवलंबली पाहिजे. कारण ; योगसाधना हा एक दिवसीय इव्हेंट नाही तर दररोज अखंडपणे करण्याची साधना आहे.”
पी.के.इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक जगन्नाथ काटे म्हणाले, “मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूंच्या अखंड उन्नतीसाठी उन्नती सोशल फाऊंडेशन कटिबद्ध आहे. आरोग्य, शिक्षण पर्यावरण, सांस्कृतिक, धार्मिक, क्रीडा अश्या प्रत्येक क्षेत्रात उन्नती सोशल फाऊंडेशन आघाडीवर आहे. आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेला उपक्रम हा पिंपळे सौदागर आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा दृष्टीने निश्चितच दिशादर्शक ठरणार आहे. आपल्या भारताच्या प्राचीन परंपरेला पुढे घेऊन जाण्यासाठी उन्नती सोशल फाऊंडेशनच्या पुढाकाराने सुरू केलेल्या उपक्रमाला माझ्या मनापासून शुभेच्छा.
सूत्रसंचालन सौ.भामिनी महाले यांनी केले. याप्रसंगी पी.के.इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक जगन्नाथ काटे, संपर्कप्रमुख उत्तर महाराष्ट्र-भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश मनोज ब्राह्मणकर, वाल्मिक काटे, विकास काटे, सुभाष पवार, रमेश वाणी, अनिल कुलकर्णी, सखाराम ढाकणे, रमेश चांडगे, दिलीप चौगुले, अशोक येळमकर, राजेंद्रनाथ जयस्वाल, विलास नगरकर, वाल्मिक काटे, विकास काटे, सतीश काटे यांच्यासह ऑल सिनिअर सिटीझन असोसिएशनचे सदस्य, कोकणे चौक जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य, विठाई वाचनालयाचे सदस्य, आनंद हास्य क्लबचे सदस्य आणि उन्नती सोशल फाउंडेशन चे सर्व सदस्य जेष्ठ नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group