पिंपरी :- चिंचवड येथील स्वर्गीय फकिरभाई पानसरे एज्युकेशन फाऊंडेशनच्या कॉलेज ऑफ फिजीओथेरपी तर्फे नवरात्रोत्सव आणि दसर्याच्या निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी १०० जणांची तपासणी करण्यात आली. संस्थेतर्फे दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येणार असून यावर्षी उपक्रमाचे पहिलेच वर्ष आहे.
सदर तपासणी शिबिरासाठी ट्रस्टच्या चेअरमन निलोफर पानसरे, विश्वस्त निहाल पानसरे, संचालिका डॉ. झोया पानसरे यांनी उपस्थित राहून उपक्रमाचे नियोजन केले. यावेळी डॉ. श्याम अहिरराव व निहाल पानसरे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. राजु शिंगोटे यांनी केले. कार्यक्रमाचे सूचसंचालन ओपीडी इनचार्ज डॉ. तेजस बोरकर यांनी तर आभाराचे काम कॉलेजच्या प्राचार्या डॉ. स्वाती भिसे यांनी पार पाडले.