पिंपरी (Pclive7.com):- तुमच्या क्रेडिट कार्डवर ६ हजार ८५० रूपये रिवॉर्ड पॉईंट जमा झालेत. त्याची मुदत उद्या संपत आहे. पाठवलेल्या लिंकवर क्लिक करून रिवॉर्ड पॉईंट घ्या, असा खोटा मॅसेज पाठवून तरूणाच्या क्रेडिट कार्डमधून १ लाख ९८ हजार रूपये परस्पर काढून घेत ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे.
या प्रकरणी दिग्विजय हिरालाल गढरी, (वय २८), रा. स्पार्कल एव्हेन्यू सोसायटी, दत्तनगर, दिघी यांनी दिघी पोलीसांत BSPL PT DELHI IN चा खातेदार विरोधात (दि.०१) गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या मोबाईलवर दि.१७ ऑगस्ट २०२२ रोजी अज्ञात मोबाईल नंबर वरून VM-ICASHB असा मॅसेज पाठविण्यात आला. त्यामध्ये तुमच्या आयसीसीआय बॅंकेच्या क्रेडिट कार्डवरती ६,८५०/- रिवॉर्ड पॉईंट जमा झालेत, त्याची मुदत उद्या संपत आहे. तुम्ही या लिंकवर क्लिक करून रिवॉर्ड पॉईंट घ्या असा खोटा मॅसेज आला. त्यानंतर त्या लिंकवर क्लिक केले असता ICICI REWARDS हे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. व त्यावर क्रेडीट कार्डचा नंबर, CCV, Card Expiration date असे टाकून सबमिट करण्यास सांगितले. त्यानंतर तरूणाच्या क्रेडीट कार्डमधून १,५०,०००/- व नंतर ४८,०००/- असे दोन वेळा एकून १ लाख ४८ हजार रूपये परस्पर काढून घेण्यात आले.
याप्रकरणी दिघी पोलीसांत ऑनलाईन फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरिक्षक वाघमोडे हे पुढील तपास करित आहेत.