पिंपरी (Pclive7.com):- सराफाने ग्राहकाच्या १७ तोळे ५ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केला. हा प्रकार पिंपरीगाव येथील जयलक्ष्मी ज्वेलर्स येथे ६ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीत घडला आहे.
हितेश रमेश दोशी (४५, रा. काळेवाडी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रॉनी ताजूद्दीन शेख (रा. पिंपरी. मूळ रा. पश्चिम बंगाल) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांच्याकडील १७५ ग्रॅम वजनाच्या ७ लाख ८७ हजार ५०० रुपयांच्या दोन सोन्याच्या लगडी आरोपी याला दिल्या होत्या. आरोपी फिर्यादी यांना नेकलेस, गंठण, अंगठ्या, चैन, झुमके तयार करून देणार होता. मात्र, आरोपीने दागिन्यांचा अपहार करून फसवणूक केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.