पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक प्रचारादरम्यान भारतीय जनता पार्टी +बाळासाहेबांची शिवसेना+आरपीआय (ए)+रासप+शिवसंग्राम संघटना+रयत क्रांती संघटना +प्रहार संघटना या महायुतीची अधिकृत उमेदवार अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांनी आज जुनी सांगवी परिसरातील नागरिकांची भेट घेऊन त्यांच्यासोबत संवाद साधला. तसेच श्री गणरायाचे दर्शन घेतले.

यावेळी मतदारांशी संवाद साधताना अश्विनी जगताप म्हणाल्या की, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्याप्रती लोकांच्या मनात असलेला जिव्हाळा आणि आमच्या पाठीशी असलेले आशिर्वाद अत्यंत उर्जादायी आणि प्रेरणा देणारे आहेत. भाऊंनी या केलेला विकासाचा वारसा पुढे चालवायचा आहे. सांगवी, जुनी सांगवी परिसरातील नागरिकांशी भाऊंचे विशेष जिव्हाळ्याचे नाते होते. येथील नागरिक कायम त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. आता या लढाईत येथील जनता भाऊंप्रमाणेच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी माजी महापौर सौ.उषा उर्फ माई ढोरे, माजी उपमहापौर सौ.नानी घुले तसेच माजी नगरसेवक, नगरसेविका, भाजपा व मित्रपक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संबंधित परिसरातील नागरिक बांधव उपस्थित होते.
Tags: Ashwini JagtapbjpBjp ChinchwadChinchwad ElectionChinchwad Vidhansabha ElectionJuni Sangavilaxman jagtapSangavi






















Join Our Whatsapp Group