अश्विनी आणि शंकर जगताप यांनी प्रत्येकी चार-चार अर्ज दाखल केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांचे दोन्ही अर्ज वैध ठरले. तर, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बंडखोर राहूल कलाटेंचे तीनपैकी दोन अर्ज वैध ठरले. तर एक बाद झाला. शिवसेनेचा त्यांचा अर्ज हा पक्षाचा एबी फॉर्म नसल्याने बाद करण्यात आला. तर, अपक्ष म्हणून त्यांची उमेदवारी वैध ठरली आहे. चेतन ढोरे या अपक्षाचे प्रतिज्ञापत्र अपूरे असल्याने, तर गणेश जोशी आणि उमेश म्हेत्रे या अपक्षांकडे पुरेसे सूचक नसल्याने या तिघांचे अर्ज बाद झाले.
उमेदवारी अर्ज अपूर्ण ठेवल्याचा फटका आणखी एक अपक्ष प्रकाश बालवडकर यांनाही बसला. तर, संजय मागाडे या आणखी एका अपक्षाने अनामत रक्कम तथा अर्ज शुल्क न भरल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. अशारितीने ४० उमेदवारांनी दाखल केलेल्या ५३ अर्जांपैकी सात उमेदवारांचे १३ अर्ज बाद झाले. तर ३३ उमेदवारांचे चाळीस अर्ज वैध ठरले आहेत.
त्यात बहूतांश म्हणजे २६ उमेदवार अपक्ष, पाच नोंदणीकृत पक्षांचे, तर दोन राष्ट्रीय पक्षांचे आहेत. दहा तारखेपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. त्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होईल. मतदानासाठी एक की दोन ईव्हीएम लागणार हे ही कळेल. २६ तारखेला मतदान होऊन २ मार्चला निकाल आहे.