पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे सोमवार दि.१३ रोजी स्पेनच्या दौ-यावर जाणार आहेत. या दौ-यात महापौर काळजे तेथील विविध प्रकल्पांची माहिती घेणार असून २१ नोव्हेंबर रोजी ते परतणार आहेत.
नुकतेच पिंपरी महापालिकेतील नगरसेवक आणि अधिकारी बीआरटी विषयक अधिक माहिती घेण्यासाठी अहमादाबादचा दौरा करुन आलेत. या दौ-याचे फलित काय झाले? असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच आता महापौर काळजे स्पेन देशाच्या दौ-यावर जाणार आहेत. या दौ-यासाठी येणा-या ५ लाख २२ हजार रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने नुकतीच मान्यता देखील दिली आहे.
स्पेन देशातील बार्सिलोना शहरात १४ते १६ नोव्हेंबर या कालावधीत ‘स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ल्ड काँग्रेस २०१७’ या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित देशांमधील स्मार्ट सिटीअंतर्गत केलेले पायाभूत सुविधांचे नियोजन, विकासकामे, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण, वेगवान दळणवळण आणि परिवहन यंत्रणांचे प्रदर्शन व प्रात्यक्षिके आयोजित करण्यात येणार आहेत. या परिषदेसाठी महापौर नितीन काळजे सोमवारी जाणार आहेत. ८ दिवसानंतर महापौर शहरात परतणार आहेत.






















Join Our Whatsapp Group