पिंपरी (Pclive7.com):- पोलिस सारथी सामाजिक संस्था (महाराष्ट्र राज्य) व मा. शहाजी अंकुशराव भोसले ( संस्थापक अध्यक्ष पोलीस सारथी सामाजिक संस्था) यांनी निगडी-प्राधिकरण विभागातील पदाधिकारी नियुक्त केले. यावेळी आदित्य कुलकर्णी, फरदीन मोमीन, तेजस धुमाळ, स्वप्नील रणदिवे, अनुराग पाटील, यश गायकवाड, अकिब मोमीन आदी उपस्थित होते.

खालीलप्रमाणे यांची निवड करण्यात आली..
अभिषेक कुलकर्णी (विभाग अध्यक्ष), अतुल कोळी (कार्याध्यक्ष), अस्जड मुल्ला (प्रसिध्दी प्रमुख), नितीन गावडे (संपर्क प्रमुख), अमित संदाशिव (युवा अध्यक्ष), प्रियंका बांदल (महिला विभाग अध्यक्ष) या सर्व पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

यावेळी शहाजी अंकुशराव भोसले असे म्हणले की, आपल्या विभातील पोलिसांना सहकार्य करा व जास्तीत जास्त आपल्या हातून समाजकार्य घडू द्या. आपल्या विभागातील नागरिकांच्या अडचणी दूर करा असे देखील म्हणाले. पोलीस सारथी सामाजिक संस्था यांचे काम संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे. या संस्थेच्या मार्फत पोलिसांचे धैर्य वाढवणे व समजसेवा करणे असा संदेश लोकांपर्यंत पोहचवत आहे. संस्थेचा अधिक विस्तार करून दिलेली जवाबदारी निष्ठेने पार पाडावी. तसेच संस्थेचे विचार समाजातील तळागाळात पोहोचवण्याचे यशस्वी प्रयत्न करावे असे आवाहन केले. पोलीस सारथी संस्थेचे ध्येय धोरणे आम्हाला मान्य आहे असे सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सांगितले.