पिंपरी (Pclive7.com):- साहित्य घरपोच करण्यासाठी (डिलिव्हरी) गृहनिर्माण सोसायटीमध्ये गेल्यानंतर पाळत ठेवून सायकली चोरून ‘ओएलएक्स’ अँपवर जाहिरात देऊन विक्री करणाऱ्या डिलिव्हरी बॉयला वाकड पोलिसांनी अटक केली. राहुल रविंद्र पवार (वय २५, रा. काळेवाडी) असे अटक केलेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. याबाबत संदीप दिगंबर तांबे (वय ४३, रा. रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
आरोपी राहुल हा साहित्य घरपोच करण्याचे काम करतो. साहित्य देण्याच्या बहाण्याने तो सोसायटीमध्ये जायचा आणि सायकलीवर पाळत ठेवत होता. वेळ मिळाल्यानंतर तो सायकली चोरत होता. ‘ओएलएक्स’ अँपवर जाहिरात देवून लोकांना विकत होता. आरोपी राहुल चोरीची सायकल विकण्यासाठी तापकीर मळा येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ८५ हजार रुपये किंमतीच्या सहा महागड्या सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त, परि-२ डॉ. काकासाहेब डोळे, सहा पोलीस आयुक्त वाकड विभाग श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलीस निरीक्षक गुन्हे २ रामचंद्र घाडगे, सहायक पोलीस निरिक्षक संतोष पाटील, पोलीस उपनिरिक्षक सचिन चव्हाण, सहायक पोलीस फौजदार विभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, पोलीस हवालदार बंदु गिरे, संतोष वर्ग, स्वप्निल खेतले, दिपक साबळे, अतिश जाधव, प्रमोद कदम, पोलीस नाईक अतिक शेख, विक्रांत चव्हाण, प्रशांत गिलबीले, पोलीस शिपाई अजय फल्ने, तात्या शिंदे, स्वप्निल लोखंडे, सौदागर लामतुरे, विनायक घारगे, रमेश खेडकर, कौतैय खराडे, भास्कर भारती यांनी मिळून केली आहे.