पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष दिलीप पांढरकर यांच्या आकुर्डीतील जनसंपर्क कार्यालयात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ नेते राहुल गांधी तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर, मेडिकल चेकअप, नेत्रचिकित्ता व मोफत चष्मे वाटप हा कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महिला कमिटीच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा बिंदूताई तिवारी, पिंपरी चिंचवड शहर महिला काँग्रेस कमिटीच्या महिला शहराध्यक्षा सायलीताई नढे, औद्योगिक सेल शहराध्यक्षा प्रतिभा कांबळे, प्रभारी असंघटित काँग्रेस शितल कोतवाल, स्वाती शिंदे, आशा भोसले, दिलीपशेठ पांढरकर, एडवोकेट अनिरुद्ध कांबळे, वैशाली परदेशी, माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे,
राजाभाऊ गोलांडे, विश्वास गजरमल, अख्तरभाई चौधरी, बबनराव जाधव, दत्तात्रय दातीर पाटील, किरण नढे, अमित पांढरकर, राजेंद्र काळभोर, सचिन गायकवाड, रवींद्र कांबळे, बाबुलाल वाघमारे, संदेश नवले, आबासाहेब खराडे, मयूर जयस्वाल सरचिटणीस महाराष्ट्र युवक काँग्रेस, मकरध्वज यादव, गौरव चौधरी, अमरसिंह नाणेकर, शैलेश वाल्हेकर, दिनकर भालेकर, किसन भालेकर, राहुल जाधव, गणेश साने सूत्रसंचालन हर्षवर्धन पांढरकर, सुरेश लिंगायत आदी उपस्थित होते.