पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिं चवडमधील मोशी येथे मानसिक तणावातून विवाहित महिलेने इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना काल सकाळी पावणे दहाच्या सुमारास घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आत्महत्येची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी या ठिकाणी सह्याद्री सोसायटीमध्ये मृत महिला पती आणि लहान मुलासह राहण्यास आहे. गेल्या तीन महिन्यापासून त्या सह्याद्री सोसायटीमध्ये राहतात. त्यांचा पती संगणक अभियंता असल्याचं पोलिसांनी सांगितलं असून आज सकाळी पती आणि मुलं घरी असताना इमारतीच्या नवव्या मजल्यावरून थेट उडी घेत महिलेने आत्महत्या केली आहे. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.