पिंपरी (Pclive7.com):- डाॅ.दीक्षित जीवनशैलीचा अंगिकार करुन आपण स्थूलत्व व मधुमेहाला स्वतःपासून लांब ठेवू शकतो, हजारो लोक या सोप्या जीवनशैलीचे पालन करुन स्थूलत्व व मधुमेहमुक्त झाले आहेत असे प्रतिपादन असोसिएशन फॉर डायबेटीस अँड ओबेसिटी रिव्हर्सल च्या विश्वस्त डॉ.वेदा नलावडे यांनी केले. त्या अडोर ट्रस्टच्या वतीने पिंपरी-चिंचवड येथील कोकणे चौक या ठिकाणी पार पडलेल्या वाॅकेथॉनच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.

पिंपरी-चिंचवड सह जगभरातील 270 पेक्षा अधिक ठिकाणी व 15 देशांमध्ये डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली या विश्वविक्रमी वाॅकेथाॅनचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी चिंचवड मध्ये 17 ठिकाणी या पाच किलोमीटर चालण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी चिंचवड मधील शेकडो लोकांनी यात सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भोसरी, पिंपरी, वाकड, चिंचवड, निगडी, पिंपळे सौदागर, रावेत अशा विविध 17 ठिकाणी हे वाॅकेथाॅन संपन्न झाले. ल
पिंपळे सौदागर येथील वाॅकेथाॅनला डॉ. वेदा नलावडे यांनी हिरवा झेंडा दाखवून वाॅकेथाॅनला सुरुवात झाली. ‘दिवसातून दोन वेळा जेवा व 45 मिनिटे चाला’असा संदेश या वाॅकेथाॅनच्या माध्यमातून देण्यात आला. या वाॅकेथाॅनला अडोर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी धावती भेट दिली व अडोर ट्रस्ट तर्फे पुणे तसेच वाकड या ठिकाणी चालवण्यात येणाऱ्या मोफत मधुमेह सल्ला केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्थूलत्व व मधुमेह मुक्त अभियानाचे समन्वयक डॉ.संतोष ढुमणे यांनी केले.
पिंपरी-चिंचवड मधील आयोजनाची व्यवस्था प्रा.दीपक येवले, प्रीतम वाघमैतर, विवेक कुलकर्णी, दीपक नेरकर, सोनाली पाटील, अमोल भोकरे, दिलीप गायकवाड, चंद्रकांत शेळके, प्रकाश ठोसरे, तुषार कवडे, अमित मोहिते, नरेंद्र ईचे, रामकृष्ण आहेर, अभिजीत भस्मे, सोमनाथ वागवकर, विजय शिंदे, प्रतिभा सचिन, राणबा हक्के व पिंपरी-चिंचवड मधील स्वयंसेवकांनी पाहिली.





















Join Our Whatsapp Group