पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोशिएशनची निवडणूक ३१ ऑक्टोबर रोजी पार पडली. सहा सदस्य व सहसचिव यांची बिनविरोध निवड झाली तर अन्य पदांसाठी मतदान पार पडले. अत्यंत चुरशीची झालेल्या निवडणुकीत निवड झालेल्या कार्यकारणीला प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह वाटप करण्यात आले.
या निवडणुकीचे कामकाज निवडणूक अधिकारी बारचे माजी अध्यक्ष ॲड. संजय दातीर पाटिल, ॲड. सुभाष चिंचवडे, ॲड. विलास कुटे, ॲड. अनिलकुमार तेजवानी, ॲड. सुहास पडवळ, ॲड. देवराम ढाळे, ॲड. उत्तम चिखले, ॲड. सुशील मंचरकर, ॲड विजय शिंदे यांनी पाहिले.
निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी दोन उमेदवार रिंगणात होते. त्यात विजयी उमेदवार ॲड. रामराजे भोसले यांना ४६८ मते तर ॲड. पांडुरंग शिंगारे यांना २४० मते मिळाली. उपाध्यक्ष पदाकरिता यावेळी दोन महिला वकिल रिंगणात होत्या. त्यामध्ये विजयी उमेदवार ॲड. प्रतिक्षा खिलारी यांना ३९८ तर ॲड. कांता गोरडे यांना ३०२ मते मिळाली. सचिव पदाकरिता दोन उमेदवारांमध्ये लढत होती. यामध्ये विजयी उमेदवार ॲड. धनंजय कोकणे यांना ४४८ तर ॲड. सागर अडागळे यांना २६४ मते मिळाली.
महिला सचिव पदासाठी दोन उमेदवार रिंगणात होत्या. यामध्ये विजयी उमेदवार ॲड. मोनिका सचवानी यांना ३५८ मते मिळाली. तर ॲड. संगिता कुशाळकर यांना ३४७ मते मिळाली. खजिनदार पदाकरिता सुद्धा दोन उमेदवार रिंगणात होते. यामध्ये ॲड. अजित प्रदीप खराडे यांना ३७० मते मिळाली तर ॲड. रीना चंद्रकांत मगदूम यांना ३२७ मते मिळाली. हिशोब तपासणी या पदाकरिता तीन उमेदवार रिंगणात होते. यामध्ये ॲड. संदीप भाऊसाहेब तापकीर यांना ३१७ मते मिळाली तर ॲड. नदाफ फैयाज अल्ताफ यांना २२६ मते मिळाली. तिसऱ्या महिला उमेदवार ॲड. सारिका भीमराव रणदिवे यांना १५४ मते मिळाली.
निवडून आलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह वाटपाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. पिंपरी नेहरूनगर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आर एस वानखेडे, एम जी मोरे, आर एम गिरी, एन आर गजभिये, पी सी फटाले यांच्या उपस्थितीत हा हा कार्यक्रम झाला. निवडणूक अधिकारी म्हणून कामकाज केलेल्या ज्येष्ठ वकिलांचा नवीन कार्यकारणीच्या वतीने सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन ॲड. सारिका परदेशी यांनी केले. आभार नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले यांनी मानले.
पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनची नवीन कार्यकारणी
अध्यक्ष – ॲड. रामराजे भोसले
उपाध्यक्ष – ॲड. प्रतीक्षा खिलारी
सचिव – ॲड. धनंजय कोकणे
सह सचिव – ॲड. उमेश खंदारे
महिला सचिव – ॲड. मोनिका सचवाणी
खजिनदार – ॲड. अजित खराडे
हिशोब तपासणीस – ॲड. संदीप तापकीर
सदस्य – ॲड. दशरथ बावकर
सदस्य – ॲड. दर्षले राजू मीनल
सदस्य – ॲड. स्वाती गायकवाड
सदस्य – ॲड. अस्मिता पिंगळे
सदस्य – ॲड. अय्याज शेख
सदस्य – ॲड. फारुख शेख.