पिंपरी (Pclive7.com):- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गणपत गोरखे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात प्रथमच “भव्य पुस्तक प्रदर्शन” आयोजित करण्यात आले आहे.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2023/11/IMG-20231103-WA0009-225x300.jpg)
नोव्हेल शिक्षण संस्था, कलारंग कला संस्था, पिंपरी-चिंचवड ऑलंपिक असोसिएशन य़ांच्या संयुक्त विद्यमाने आणि महाराष्ट्र राज्य साहित्य परिषद पिंपरी चिंचवड, अखिल भारतीय साहित्य परिषद महाराष्ट्र, भारतीय विचार साधना महाराष्ट्र, कामगार साहित्य परिषद, नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ, पिंपरी चिंचवड, बंधूता प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड, मातंग साहित्य परिषद, समरसता साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड साहित्य मंच यांच्या विशेष सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. चिंचवड येथील बर्ड व्हॅली जवळ नोव्हेल इंटरनॅशनल स्कूल ग्राऊंडवर शनिवार दि.४ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५ ते ७.०० वाजेपर्यंत हे प्रदर्शन राहणार आहे. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी १० ते ८ वाजेपर्यंत पुस्तक प्रदर्शन सर्वासाठी खुले राहणार आहे.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2023/11/IMG-20231014-WA0012-300x150.jpg)
वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ न आणता एक पुस्तक आणावे. या प्रदर्शनात पुस्तक विक्रीतून मिळणारा निधी अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्यात येणार आहे. या अभिनव उपक्रमाचा भाग बनावे व या कार्यक्रमास उपस्थित राहून वाचन संस्कृतीला प्रेरणा द्यावी, असे आवाहन माजी नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी केले आहे.