पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. दिवाळीची खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची यामुळे मोठी तारांबळ उडाली.
आज (दि.१०) सायंकाळी सहाच्या सुमारास शहरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. हवामान खात्याने दिवसभरात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. सकाळपासूनच ढगाळ वातावरण देखील होते. अखेर सायंकाळी धो- धो पाऊस बरसला, ऐन दिवाळीमध्येच पाऊस कोसळल्याने खरेदी करण्यासाठी बाहेर पडलेले नागरिक आणि व्यापाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली.