पिंपरी (Pclive7.com):- प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे आज (दि.०२) उद्घाटन संपन्न झाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात जोरदार शक्ती प्रदर्शनही करण्यात आले.

यावेळी पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष तुषार कामठे, जेष्ठ नेते आझम पानसरे, माजी नगरसेविका सुलक्षणा शीलवंत यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहरावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांचा कायम वरचष्मा राहिला आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरही अजित पवार गटातचं प्राबल्य शहरात दिसत होतं. मात्र शरद पवार गटानेही पिंपरी चिंचवडकडे विशेष लक्ष केंद्रित केल असून शहराच्या मुख्य असलेल्या पिंपरी चौकात अजित पवार गटाच्या कार्यालयासमोरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्या हस्ते आज संपन्न झाले.
Tags: आझम पानसरेजयंत पाटीलतुषार कामठेपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसप्रदेशाध्यक्षराष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट