पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विशेष मोहिमे अंतर्गत, प्रभाग क्र.०२ मधील कुदळवाडी, चिखली ३० मीटर डी.पी.रस्त्यामधील सुमारे १,६२,००० चौ.फुट क्षेत्रातील १५ वीट बांधकाम व पत्राशेड इत्यादीवर अतिक्रमण निष्कासनाची आज कारवाई करण्यात आली व रस्ता रुंदीकरण करण्यात आले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे – पाटील, शहर अभियंता मकरंद निकम व मनोज लोणकर उपआयुक्त यांचे निर्देशानुसार कारवाई करणेत आली.
क, ई,फ व ह क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, सिताराम बहुरे व उमेश ढाकणे तसेच कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे, उपअभियंता सुर्यकांत मोहिते, मनोज बोरसे,नरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली कनिष्ठ अभियंता संदिप वैद्य, किरण सगर, इम्रान कलाल, क्षितीजा देशमुख,चंद्रकांत पाटील, प्रियंका म्हस्के, रचना दळवी व संदिप वाडीले तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ऎश्वर्या मासाळ,केशव खांडेकर, निकिता फ़डतरे, श्रीकांत फ़ाळके, स्मिता गव्हाणे व मनपा कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बल, महाराष्ट्र पोलिस, यांच्या नियंत्रणाखाली सदर कारवाई करण्यात आली.
प्रभाग क्र.०२ चिखली/कुदळवाडी परिसरातील सुमारे १,६२,००० चौ.फुट वीट बांधकाम व पत्राशेडवर अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात आली. दि.२८/०२/२०२४ रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत क, ई, फ व ह क्षेत्रीय कार्यालयाकडील अतिक्रमण पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल व महाराष्ट्र पोलीस पथक, सहभागी झाले होते.
दररोज शहराच्या विविध भागात अतिक्रमण कारवाई केली जात आहे. नागरिकांनी रस्त्यांवर बेवारस वाहने उभी करुन नये, तसेच अनधिकृत टप-या व पत्राशेड व बॅनर्स उभारु नये. तसेच फ़ुटपाथ स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, महानगरपालिका आयुक्त यांच्या निर्देशनानुसार सदर कारवाई केलेल्या ठिकाणी मनपा परवानगी घेतल्याशिवाय अनधिकृत पत्राशेड, बांधकाम करु नये, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.