पिंपरी (Pclive7.com):- गेल्या दोन तासांपासून फेसबुक आणि इन्स्टाग्राम पूर्णपणे डाऊन झाले आहे. नेटकऱ्यांचे फेसबुक बंद पडले आहे. दोन्हीही सोशल मीडिया लॉग आऊट झाले असून लॉग करताना अडचणी येत आहेत. नेटकऱ्यांना मंगळवारी (दि.५) रात्री ९ वाजल्यापासून या अडचणांना सामोरे जावे लागत आहे. यापूर्वीही अनेकदा अशा समस्यांना नेटकऱ्यांना सामोरे जावे लागले आहे.
फेसबुक किंवा इन्स्टाग्रामकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेले नाही. दरम्यान, सातत्याने फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर सक्रिय राहणाऱ्या नेटकऱ्यांची चांगलीच गैरसोय होताना दिसत आहे. फेसबुक वापरता येत नसल्यामुळे नेटकरी अस्वस्थ झाले आहेत.