पिंपरी (Pclive7.com):- तुमच्या नावचे पार्सल असून त्यात पासपोर्ट व ड्रग्स आहेत’, अशी बतावणी करत या प्रकरणातून बाहेर काढण्याच्या बहाण्याने १० लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. वाकड येथे बुधवारी (दि.२०) ही घटना घडली. फसवणूक झालेल्या एकाने याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून एक मोबाइल क्रमांकधारक, संतोष कुमार व दोन अनोळखींवर गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला संशयित व्यक्तीने मोबाइल क्रमांकावरून फोन केला व फेडेक्स इंटरनॅशनल कुरिअर मधून संतोष कुमार बोलत असल्याचे सांगितले. एक पार्सल मुंबई ते बँकॉक द्यायचे होते. ते तुमच्या नावावर आहे. ते ब्लॉक करण्यात आले असून त्यात पाच पासपोर्ट, ३ क्रेडिट कार्ड, १ लॅपटॉप कपडे व १४४ ग्रॅम एमडी ड्रग्ज आहे. तुमचा कॉल मुंबई क्राईम ब्रँचकडे ट्रान्सफर करत असल्याचे सांगितले. फिर्यादी या साऱ्या प्रकाराने घाबरले. यावेळी फिर्यादी यांना या प्रकारातून बाहेर काढू मात्र याबाबत घरी पत्नी किंवा इतरांना काहीही सांगू नका, असे सांगण्यात आले.
यावेळी एचडीएफसी बँकेत स्वप्नील दरबे यांच्या नावाने खाते आहे. या खात्यावरून मनी लॉन्ड्रिंग व ह्यूमन ट्राफिकिंग होत आहे. त्यात तुमच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळे तुम्ही संशयित आहात अशी भीती घालण्यात आली. पुढे त्यांनी फिर्यादीला एक बैंक अकाऊंट क्रमांक देऊन त्यावर नऊ लाख ९९ हजार ९९९ रुपये भरा, यातून तुमची सुटका करू, असे सांगितले.