पिंपरी (Pclive7.com):- इस्कॉन श्री गोविंद धाम रावेत मंदिराचा तेरावा वर्धापन दिन आज साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन आज (दि.२७ मार्च) करण्यात आले आहे. सायंकाळी साडेसहा वाजता या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमांमध्ये भजन कीर्तन श्री राधा कृष्णांचा अभिषेक महाआरती आणि महाप्रसाद अशा कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे.
यंदाचं तेरावं वर्ष पूर्ण झालेला असून त्या निमित्ताने मंदिरात खूप सुंदर सजावट करण्यात आलेली आहे. अनेक भाविक गेली दोन दिवस या उत्सवासाठी मन लावून सेवा करत आहेत. काल सायंकाळी पालखी उत्सव साजरा करण्यात आला आहे. आणि आज विशेष दिवस सकाळपासूनच भगवंतांचा शृंगार दिवसभर दर्शन असा सुंदर लाभ सर्व लोकांना मिळणार आहे. तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.