भोसरी (Pclive7.com):- अजित पवारांनी शिरूर लोकसभेसाठी शिवाजी आढळरावांची वर्णी लावली, तेंव्हापासून भोसरीचे माजी आमदार विलास लांडे जणू गायबच झालेत. ते पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश तर करणार नाहीत ना? अशी चर्चा शिरूर लोकसभेत रंगलेली आहे.
२०१९ प्रमाणे यंदाही विलास लांडेंना डावलण्यात आल्यानं ते कमालीचे नाराज आहेत. पुढची भूमिका ही त्यांनी गुलदस्त्यात ठेवली आहे. एरवी लांडेंनी माध्यमांसमोर येऊन आपली आहे ती अगदी टोकाचीही भूमिका जाहीरपणे मांडलेली आहे. पण गेल्या आठवड्यात शिरूर लोकसभेत झालेल्या बैठकीवेळी आढळरावांना उमेदवारी देणार असून तुम्हाला त्यांचा प्रचार करावा लागेल, असा आदेश अजित पवारांनी दिला तेंव्हापासून मात्र लांडे माध्यमांना टाळत आहेत. जणू ते गायबच झालेत, अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळे विलास लांडे आता यावेळी शिवाजी आढळरावांचा प्रचार करणार की? अमोल कोल्हेंच्या प्रचाराची जबाबदारी स्वीकारा, या शरद पवारांच्या आवाहनाला प्रतिसाद देणार? याकडे शिरूर लोकसभेतील प्रत्येकाचं लक्ष लागून आहे.