पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग समितीच्या आज दि.०२ फेब्रुवारी रोजी झालेल्या मासिक सभेत प्रभाग क्र. २८ पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रस्ता ‘नो हॉकर्स झोन’ व ‘नो टॉलरन्स झोन’ करण्यास मंजुरी मिळाली आहे. तसेच प्रभागातील प्रत्येक चौक हे १०० मीटर पर्यंत ‘नो हॉकर्स झोन’ करण्यास करण्यास प्रभागस्तरावर मंजुरी मिळाला आहे. स्थानिक नगरसेवक शत्रुघ्न काटे व निर्मला कुटे यांनी याबाबत मागणी करून पाठपुरावा केला होता.
पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोडवर हॉकर्समुळे सतत वाहतूक कोंडी समस्या निर्माण होत होती. तसेच रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांना, महिला, वयोवृध्द, मुले यांना चालण्यासाठी करण्यात आलेल्या रस्त्यावरील पदपथावर हॉकर्सने मांडलेल्या बाजारामुळे नागरिकांना मोठ्या अडथळ्याला सामोरे जावे लागत होते. याबाबत नागरिकांकडून सतत येणार्या तक्रारीची दखल घेत नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे यांनी कुणाल आयकॉन रस्ता ‘नो हॉकर्स झोन’ व ‘नो टॉलरन्स झोन’ करण्याची मागणी केली होती. तसेच कुणाल आयकॉन रस्त्यावरील सर्व हॉकर्स प्रभागातच दुसऱ्या एखाद्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे अशी ही मागणी केली होती. कुणाल आयकॉन रोड वर होणारी सतत हॉकर्स मधील वाढ हा देखील चिंतेचा मोठा विषय झाला होता.
शत्रुघ्न काटे व निर्मला कुटे यांच्या प्रयत्नामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यात मोठी मदत होणार आहे. या निर्णयामुळे या परिसरातील नागरिकांना सुटकेचा निःश्वास मिळणार असून लवकरच ही समस्या दूर होणार आहे.






















Join Our Whatsapp Group