पिंपरी (Pclive7.com):- पिस्तूल व जिवंत काडतुसासह एका २० वर्षीय तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (दि.२१) थेरगाव येथे वाकड पोलिसांनी केली आहे.
बॉन्ड उर्फ रोहित राहूल शिंदे (वय २० रा. रहाटणी) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई अजय फल्ले यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा त्याच्याकडे अवैधरित्या २५ हजार रुपयांचे पिस्तूल व २ हजार रुपयांचे जिवंत काडतुस असा एकूण २७ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. यावरून वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विठ्ठल साळुंखे, पोलीस उपनिरिक्षक सचिन चव्हाण, अनिरुध्द सावर्डे, बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, सहायक पोलीस फौजळार राजेंद्र काळे, पोलीस हवालदार वंदु गिरे, अतिश जाधव, अतिक शेख, विक्रांत चव्हाण, पोलीस नाईक प्रशांत गिलबीले, रामचंद्र तळपे, पोलीस शिपाई विनायक घार्गे, अजय फल्ले, सौदागर लामतुरे, कौंतेय खराडे, रमेश खेडकर, ज्ञानदेव झेंडे यांनी मिळुन केली आहे.