उरण (Pclive7.com):- मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी गुरुवारी रात्री उरण तालुक्यातील श्रद्धास्थान असलेल्या श्री रत्नेश्वरी देवी व श्री शांतेश्वरी देवी यांचे यात्रेनिमित्त मंदिरात जाऊन पूजा केली व आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी जसखार व नवीन शेवा या गावांमधील मान्यवरांच्या निवासस्थानी जाऊन गाठीभेटी घेतल्या.
उरण तालुक्यातील जसखार येथील श्री रत्नेश्वरी देवी यात्रा व पालखी सोहळ्यात खासदार बारणे दरवर्षी सहभागी होतात. या वर्षीही ते आवर्जून जसखारच्या मंदिरात जाऊन रत्नेश्वरी मातेचे दर्शन घेतले. त्यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मेघाताई दमडे व अन्य पदाधिकारी होते. नितीन पाटील, दीपक ठाकूर, अमित ठाकूर, गणेश घरत, उपसरपंच प्रणाली म्हात्रे आदी पदाधिकाऱ्यांनी खासदार बारणे यांचे स्वागत व सत्कार केला. भाजपचे ज्येष्ठ नेते पी. जे. पाटील तसेच मधुकर पाटील व संदीप भोईर यांच्या निवासस्थानी बारणे यांनी सदिच्छा भेट दिली. फटाके वाजवून व औक्षण करून बारणे यांचे स्वागत करण्यात आले.
नवीन शेवा येथील श्री शांतेश्वरी देवीच्या मंदिरात जाऊन खासदार बारणे यांनी दर्शन घेतले. नवीन शेवा ग्राम सुधारणा मंडळाच्या वतीने अध्यक्ष कमलाकर पाटील तसेच चंद्रकांत घरत, पंडित घरत, हिराजी घरत, एस. जी. म्हात्रे, भारत भोईर, हेमंत म्हात्रे, भगवान घरत, रमेश म्हात्रे, आदिनाथ भोईर, भावेश भोईर, मालती म्हात्रे, राकेश भोईर आदींनी बारणे यांचे स्वागत व सत्कार केला. गावातील काही मान्यवरांची त्यांनी घरी जाऊन भेट घेतली. निवडणुकीत सहकार्य करण्याची विनंती बारणे यांनी केली.


























Join Our Whatsapp Group