भोसरी (Pclive7.com):- आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने पंढरपुरात दाखल होतात. तसेच राज्यातील गावोगावी देखील विविध मंदिरांमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तिभावाने भाविक गर्दी करत असतात. त्याच निमित्त कुदळवाडी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांच्या वतीने आज दर्शनासाठी आलेल्या भाविकांना फराळ वाटप करण्यात आला.
याप्रसंगी दिनेश यादव यांनी आजच्या आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी सर्व भाविक भक्तांना, वारकरी बांधवांना मनापासून शुभेच्छा देत फराळाचे वाटप केले.
आमदार पै. महेशदादा लांडगे युवा मंच व हभप वामनमहाराज यादव, कै. नथु खंडु यादव, कै. बबाबाई नथु यादव, कै. सुदाम नथु यादव, गुलाब नथु यादव सेवा संस्था यांच्या वतीने कुदळवाडीत पवित्र अशा श्री विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्ताने खिचडी व फराळ वाटप करण्यात आले होते. यावेळी सर्व पदाधिकारी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन दिनेश लालचंद यादव सदस्य पिंपरी चिंचवड महानगरपालिका फ प्रभाग, अध्यक्ष आमदार पै. महेशदादा लांडगे युवा मंच यांच्या वतीने करण्यात आले होते. याप्रसंगी अनेक भाविक भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला.