पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड न्यायालय व पुणे जिल्हा विधि प्राधिकरण व पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवारी (दि.२७) राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी नेहरूनगर न्यायालयात २६७ खटले निकाली काढण्यात आले. तर आकुर्डी पीसीएमसी न्यायालयात ३२४ खटले निकाली काढण्यात आले. त्यामध्ये ९७ लाख ६२ हजार ८२१ रुपये महसूल जमा झाला. वाहतूक चलनाच्या प्रकरणात १,०३,८०० दंड जमा झाला.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2024/07/IMG-20240624-WA00001-300x300.jpg)
पिंपरी नेहरूनगर न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. चव्हाण, एल. एके. एमुदी, बी. डी. चौखट व आकुर्डी न्यायालयात वी. एस. डामरे यांनी कामकाज पाहिले. राष्ट्रीय लोकअदालत कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व पाहुण्याचे स्वागत करून झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड अॅड. बार असोसिएशनचे अॅड. सुशील मंचरकर, अॅड. संगीता परब उपस्थित होते. यावेळी सतीश गोरडे, सुहास पडवळ, राजेश पुणेकर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात दि पुणे लॉयर्स कन्झ्युमर्स को-ऑप. सोसायटी लि. संचालकपदी अॅड. राजेश पुणेकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा अॅड बार असोसिएशनतर्फे सत्कार केला. यावेळी सुदाम साने, मदनलाल छाजेड, अतुल अडसरे, रामराजे भोसले, धनंजय कोकणे, मोनिका सचवाणी, गौरव वांळुज, सुजाता बीडकर, मोनिका गाढवे, वकील उपस्थित होते.