पिंपरी (Pclive7.com):- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.५) जुनी सांगवी येथे पूर परिस्थितीची पाहणी केली. या पुरामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्राथमिक शाळेत स्थलांतरीत केलेल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी निवारा केंद्रातील नागरिकांना त्यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
यावेळी विधानपरिषद उपसभापती आमदार नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, आमदार अण्णा बनसोडे, आयुक्त शेखर सिंह, भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, माजी महापौर माई ढोरे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, हर्षल ढोरे, सागर आंगोळकर, संतोष कांबळे, अंबरनाथ कांबळे, बाळासाहेब ओव्हाळ, माजी नगरसेविका शारदा सोनवणे, शिवसेना जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वाल्हेकर, जयनाथ काटे, कामगार नेते इरफान सय्यद, दिलीप तनपुरे, राहुल जवळकर, शशीकांत दुधारे उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहरात अतिवृष्टीमुळे आणि पवना धरणातून सातत्याने होणाऱ्या विसर्गामुळे शहरातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीवरील घरांमध्ये तसेच सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या सुमारे १ हजार नागरिकांना रविवारी महापालिकेच्या वतीने निवारा केंद्रांमध्ये तसेच नातेवाईकांच्या घरी स्थलांतरित करण्यात आले होते.