पिंपरी (Pclive7.com):- खासगी फायनान्स कंपनीकडून दहा कोटी रुपयांचे कर्ज देण्याच्या बहाण्याने एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची ३१ लाख २० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार ११ जून ते २५ जुलै या कालावधीत शाहूनगर, चिंचवड येथे घडला.

संतोष भोसले (वय ३५), गणेश साहेबराव लांडगे, गणेश गोविंद फडके (४९, रा. पूर्णानगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी संजय हरिभाऊ शेटे (५१, रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश लांडगे यांनी फिर्यादी शेटे यांना रेना फायनान्स कंपनीकडून दहा कोटी रुपये कर्ज देण्याचे अमिष दाखवले. त्यासाठी कंपनीचा प्रतिनिधी संतोष भोसले याच्याशी ओळख करून दिली. शेटे यांच्याकडून १५०० रुपयांचा व ७०० रुपयांचा धनादेश भोसले यांनी घेतला. त्यानंतर एका धनादेशावरील शाई खोडून त्यावर खाडाखोड करून तो धनादेश सातारा येथील आयडीबीआय बँकेमध्ये वटवून त्यावरून २१ लाख ४५ हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले. तसेच बेरर धनादेश देऊन त्या आधारे नऊ लाख रुपये काढून घेतले. एटीएम द्वारे ७५ हजार रुपये काढून एकूण ३१ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केली.






















Join Our Whatsapp Group