पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वतीने संघचालक डॉ. गिरीश आफळे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
त्यानंतर प्रत्येक नगरातून ५०० वही व पेन अर्पण करण्यात आले. त्याचप्रमाणे सामाजिक समरसता मंचाच्या वतीने पाणपोईचे उद्घाटन खासदार अमर साबळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विलास लांडगे, मिलिंद देशपांडे, रवि कळंबकर, रमेश कुंभार, अशोक वाळके, रवि नामदे, बाळासाहेब सुबोध आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी समरसता, सदभाव गतिविधि, स्व. तात्या बापट स्मारक समिती, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती, सहकार भारती, अभाविप, धर्म जागरण, विश्व हिंदू परिषद, स्वा. सावरकर मंडळ, इ. संस्थांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.