पिंपरी (Pclive7.com):- डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त छावा संघटनेने पिंपरी येथील त्यांच्या पुतळ्याला डाॅ.बाबासाहेब आंबेडकर लिखीत ‘भारताचे संविधान व आपला आदर्श – आपली प्रेरणा महामानव’ या पुस्तकांचा हार अर्पण करुन अभिनव पध्दतीने जयंती साजरी केली.
पिंपरीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आज सकाळी छावा संघटनेच्या वतीने पुस्तकांचा हार अर्पण करण्यात आला. त्यानंतर ती पुस्तके कासारवाडी, पिंपरी, काळेवाडी, धानोरी, चंदननगर, पुणे स्टेशन या भागातील अनुवयांना वाटण्यात आली. डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजच्या तरूणांनी डोक्यात घेतले तरच खरे बाबासाहेब समजतील असे मत छावाप्रमुख धनंजय जाधव यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी छावा संघटनेचे युवा पुणे जिल्हाध्यक्ष अमोल वीर, डॉ. शेखर देवरे, नानासाहेब बालघरे, मचिंद्र चिंचोळे, समीर वीर, ज्ञानेश्वर बोरकर, किरण रजपुत, आकाश लांडगे, अभिषेक तांबे, सागर जगताप, संदिप डाके व कार्यकर्ते उपस्थित होते.अशाच प्रकारचा अभिनव उपक्रम छावा संघटनेकडुन पुणे स्टेशन येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुस्तकांचा हार अर्पण करून करण्यात आला.