पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीतील खराळवाडी येथे २५ ते ३० जणांच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड तसेच घरांवर दगडफेक करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घडला.
पिंपरीतील खराळवडीत रात्री दहाच्या सुमारास २५ ते ३० जणांच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली, तसेच घरांवर देखील दगडफेक केली. यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिक भयभीत झाले आहेत. महिलांमध्ये घबराहट पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत तोडफोड करणारे टोळके पसार झाले होते. या मागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पिंपरी पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.