पुणे (Pclive7.com):- राष्ट्रकुल २०१८ क्रीडा स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदकाची कामगिरी करणारी नेमबाज तेजस्विनी सावंतचे आज पुणे विमानतळावर मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. तेजस्विनी मुळची कोल्हापूरची असून पुण्यात ती शासकीय सेवेत काम करते.
आज सकाळपासून अनेक क्रीडाप्रेमी पुणे विमानतळावर तेजस्विनीचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते. ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत चाहत्यांनी तेजस्विनीचे स्वागत केले. यावेळी तेजस्विनीला चाहत्यांनी पुणेरी टोपी घातली.
गुरू आणि आई यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवा, ते कधीही तुमचे वाईट करणार नाहीत, असा सल्ला यावेळी तेजस्विनीने युवा खेळाडूंसाठी दिला.






















Join Our Whatsapp Group