पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सोशल मिडीया सरचिटणीसपदी रोहित कदम यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी येथे पक्षाच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शहर प्रवक्ते फजल शेख, संघटक विशाल काळभोर, राष्ट्रवादीचे नगरसेवक, पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
रोहित कदम हे गेल्या कित्तेक वर्षापासून पक्षाचे काम करत आहेत. सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रभावीपणे पक्षाची भूमिका मांडत आहेत. त्यांच्यातील गुण कौशल्याची दखल घेत पक्षाच्या वतीने रोहित कदम यांची सोशल मिडीयाच्या सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे.