पुणे (Pclive7.com):- बदलापूर आणि अंबरनाथमध्ये काही दिवसांपूर्वी वड्यामध्ये पाल आढळल्याची घटना ताज्या असतानाच असाच धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. पुण्यामध्ये समोश्याच्या गोड चटणीमध्ये चक्क मेलेला उंदीर सापडला आहे. पुण्यातील कलमा नेहरु हॉस्पिटलजवळ असणाऱ्या शारदा स्वीट सेंटरमध्ये हा प्रकार घडला.
गणेश चतुर्थीच्या दिवशी एका ग्राहकाला देण्यात आलेल्या समोश्याच्या चटणीमध्ये मेलेला उंदीर आढळला. सतत होणाऱ्या या अशा घटनांमुळे खाद्यपदार्थ विक्रेते ग्राहकांच्या आरोग्याशी कशाप्रकारे खेळत आहेत हेच दिसून येत असल्याची टिका सर्वत्र होत आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शारदा स्वीट सेंटरमधील वेगवेगळ्या पदार्थांचे नुमने तपासणीसाठी जमा केले असून ते चाचणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल येईपर्यंत शारदा स्वीट्स हे दुकान बंद ठेवण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासन विभागाने दिले आहेत.





















Join Our Whatsapp Group