पिंपरी (Pclive7.com):- रावेत परिसरात भरदुपारी घडलेल्या धक्कादायक घटनेत एका व्यक्तीवर धारदार चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात फिर्यादी महादेव बिरादार हे जखमी झाले असून पोलिसांनी आरोपी अनिल चव्हाण याला अटक केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि.२७ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास होंडा शोरूमसमोर, डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज रोड, धर्मराज चौक, रावेत येथे घडली. याप्रकरणी (दि.२८) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महादेव दिलीप बिरादार (वय ४५, व्यवसाय-भंगार जमा करणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी अनिल होशिलाल चव्हाण याच्यासोबत पूर्वीच्या वादातून भांडण झाले. या वादाचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादीशी शिवीगाळ करत त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादीच्या डाव्या हाताच्या दंडावर व मनगटाजवळ वार करून त्यांना जखमी करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक देशमुख हे करीत आहे.























Join Our Whatsapp Group