पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्यामुळे रिक्त पदांचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर महापौर रवि लांडगे यांनी प्रशासनाला तातडीने रिक्त पदे भरण्याचे निर्देश दिले आहेत.

महापौरांनी म्हटले आहे की, शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता प्रशासनिक यंत्रणा सक्षम राहणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या अनेक विभागांमध्ये मनुष्यबळाची कमतरता जाणवत असून त्याचा थेट परिणाम नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांवर होण्याची शक्यता आहे.

यासाठी सर्व विभागांनी विद्यमान तसेच आगामी काळात रिक्त होणाऱ्या पदांची सविस्तर माहिती तात्काळ सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आवश्यक पदांसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवून भरती प्रक्रिया गतीमान करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. महापौर कार्यालयाकडून या प्रक्रियेवर नियमित पाठपुरावा केला जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
“शहराचा झपाट्याने होत असलेला विकास आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता सक्षम प्रशासन ही काळाची गरज आहे. रिक्त पदांमुळे नागरिक सेवेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक त्या सर्व पदांची भरती तातडीने करण्यात यावी. तसेच या प्रक्रियेत कोणताही विलंब न होता शासनाकडे प्रस्ताव सादर करून मंजुरी मिळवावी, यावर महापालिकेने प्राधान्याने कार्यवाही करावी.”– रवि लांडगे,महापौर, पिंपरी चिंचवड महापालिका



















Join Our Whatsapp Group