पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या ‘समाधान’ हेल्पलाईनवर फोन करून ही धमकी देण्यात आली.

महापौर रवि लांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष जमदाडे-पाटील नावाच्या व्यक्तीने हा फोन केला होता. संबंधित व्यक्ती काही महिन्यांपूर्वी क्रीडा विषयक कामानिमित्त महापौरांना दोन वेळा भेटली होती. मात्र, त्यानंतर अचानक थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाली.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत भोसरी पोलिसांनी आशिष जमदाडे-पाटील याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीदरम्यान संबंधित व्यक्ती मानसिक तणावाखाली असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्याला समज देऊन सोडण्यात आल्याची माहिती महापौर रवी लांडगे यांनी दिली.

दरम्यान, या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.




















Join Our Whatsapp Group