केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या बैठकीत कामाला गती देण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश; ताथवडे-पुनावळे अंडरपास रुंदीकरणाला ‘ग्रीन सिग्नल’
पिंपरी (Pclive7.com):- ताथवडे, पुनावळे आणि वाकड या परिसरातील तीन महत्त्वाच्या सेवा रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे सक्त आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी दिले. याचबरोबर, ताथवडे आणि पुनावळे येथील अंडरपासमधील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन हे अंडरपास रुंद करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. या भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक असून अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश गडकरी यांनी दिल्याची माहिती चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी दिली.

राष्ट्रीय महामार्गांवरील प्रलंबित कामांविषयी शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यामध्ये बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत उपस्थित रहात आमदार शंकर जगताप यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील (पुणे पश्चिम बायपास) वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांकडे आमदारांनी लक्ष वेधले.

आमदार शंकर जगताप याबाबत म्हणाले सयाजी अंडरपास, भुमकर चौक, ताथवडे अंडरपास, पुनावळे अंडरपास, पवना नदी क्रॉसिंग, किवळे जंक्शन आणि मामुर्डी अंडरपास या परिसरांमध्ये सध्याच्या भुयारी मार्गांची क्षमता अतिशय कमी आहे. परिणामी, सेवा रस्त्यांचे काम तातडीने पूर्णत्वाला नेणे गरजेचे आहे. हीच मागणी गडकरी साहेबांकडे मांडली आहे. सेवा रस्त्यांची गरज आणि नागरिकांच्या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने या रस्त्यांचे काम पूर्ण करण्याचे सक्त निर्देश गडकरी यांनी दिले आहेत.

अतिरिक्त बॉक्स स्ट्रक्चर्सला “ग्रीन सिग्नल”
पुनावळे, वाकड, किवळे आणि रावेत या प्रमुख जंक्शन्सवरून रोज लाखो वाहनांची आणि जड मालवाहतुकीची ये-जा सुरू असते. वाहतुकीचा ताण लक्षात घेता या ठिकाणी अतिरिक्त बॉक्स स्ट्रक्चर्स आणि नवीन अंडरपास बांधण्याबाबत देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून हिरवा कंदील मिळाला आहे.
“ताथवडे, पुनावळे आणि वाकड परिसरातील अंतर्गत वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी सेवा रस्ते आणि अंडरपासचे रुंदीकरण अत्यंत आवश्यक आहे. या अत्यंत महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना तातडीने काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे या भागातील नागरिकांना आणि आयटी क्षेत्रातील नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल.”
– शंकर जगताप,
आमदार (चिंचवड विधानसभा)

Join Our Whatsapp Group