चिंचवड (Pclive7.com):- हेमंत डांगे युथ सोशल फाउंडेशन व सुवर्णयोग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्र.१८, चिंचवडगाव परिसरातील इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करून त्यांना सन्मानचिन्हे व शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी भविष्यातही अशाच प्रकारे यशाची परंपरा कायम ठेवावी, अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला नगरसेवक राहुल कलाटे, माजी महापौर नगरसेविका अपर्णा डोके, युवानेते अनिकेत प्रभु, जीवन विद्या मिशनचे बाळासाहेब मरळ, राजेश अवसरे, भगवान पाटील सर तसेच भाजप सरचिटणीस मधुकर बच्चे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी हेमंत डांगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते, पालकांचा विश्वास अधिक दृढ होतो आणि शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होते. त्यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे नियोजन तुषार वराडे, निखिल गावडे, विशाल साळुंके, किरण पाटील, प्रज्योत पुजारी, प्रसाद दुधुसकर, यश कुदळे आणि आकाश पांचाळ यांनी केले. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.




















Join Our Whatsapp Group