पिंपरी (Pclive7.com):- संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त भारतीय जनता पार्टी, पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने निगडी बस स्टॉप येथे वारकरी बांधवांसाठी विविध सेवा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये दोन ट्रक केळी, २५० किलो बुंदी लाडू, चहा-नाश्ता तसेच रेनकोट आणि छत्री वाटप करण्यात आले.

यावेळी आमदार शंकर जगताप, विधान परिषद सदस्य अमित गोरखे, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बाप्पू) काटे, सचिन काळभोर, सदाशिव खाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या हजारो वारकरी बांधवांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोफत अन्नदान, वैद्यकीय मदत व औषधांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

याच प्रसंगी आमदार शंकर जगताप यांनी संत तुकाराम महाराज पालखी रथासाठी ११ हजार रुपयांची देणगी अर्पण केली. वारकऱ्यांच्या सेवेसाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे आयोजन भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केले होते. या कार्यक्रमाला रमजान सनदी, रफिक शेख, राजू शेख, अक्षय सावंत, सुधीर भोसले, पप्पू हतागळे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.




















Join Our Whatsapp Group