पिंपरी (Pclive7.com):- जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी यांत्रिकी भवन या ठिकाणी हिंदू मुस्लिम एकोप्याचे दर्शन घडवणारी दिंडी वारकरी सेवा करण्यात आली.

गेल्या अनेक वर्षांपासून सुरू केलेल्या वारीसेवेला सालाबाद प्रमाणे दापोडी यांत्रिकी भवन कर्मचाऱ्यांच्या वतीने बबलू शेख मित्रपरिवार च्या वतीने दिंडीला अन्नसेवा उपक्रम राबविण्यात येतो. हा एक आगळावेगळा हिंदू-मुस्लिम धर्मीय ऐक्याचा सोहळा या ठिकाणी मोठ्या आनंदात साजरा केला जातो.
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कडून या आगळ्यावेगळ्या असणाऱ्या धार्मिक एकोपा जपणाऱ्या दिंडी सेवा सोहळ्यामध्ये वारकऱ्यांसाठी सेवा स्वरूपात 250 रेनकोटचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी दिंडी सेवा आयोजक हमीद उर्फ बबलू शेख यांच्या कन्या साहिबा शेख आणि तल्विन शेख यांच्या मोईनुद्दीन फिजिओथेरपी सेंटरच्या वतीने दिंडीतील वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यात आली या मध्ये आरोग्य तपासणी, फूट मसाज सेवा, आरोग्यवर्धक औषधे वाटप, प्रथमोपचार पेट्यांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, दापोडी यांत्रिकी भवन विभागाचे अधिकारी, दिंडी सेवा आयोजक हमीद उर्फ बबलू शेख, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, छावा मराठा युवा महासंघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, प्रदेश काँग्रेस नेते केदार पाटील, काँग्रेसचे माजी सरचिटणीस कबीर मोहम्मद, विल्यम साळवी, हिराचंद जाधव, हरीश डोळस, रवी कांबळे, सार्थक बाराथे, नितीन कांबळे, अनुप अडागळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group