पिंपरी (Pclive7.com):- पुनावळे परिसरात PMPML बसच्या धडकेत सहा वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि.११ जुलै रोजी सकाळी सुमारे ११.१५ वाजण्याच्या सुमारास पुनावळे येथील पवना नदी ब्रिजच्या अलिकडे, तुकाई नर्सरीजवळ, सर्व्हिस रोडवर घडली. फिर्यादी महिला आपल्या दुचाकीवरून सहा वर्षीय मुलीसह जात असताना PMPML बस (MH 12 QG 2079) चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बसचा दुचाकीला धक्का लागल्याने फिर्यादी यांचा तोल गेला. त्यांची मुलगी खुशबू बसच्या मागील चाकाखाली पडली. गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी बस चालक सय्यद शब्बीर मुलानी (वय ३४) याच्याविरुद्ध रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल टार्फे करत आहेत.

Tags: Bus AccidentPmpml busRavet Policeपुनावळे येथे PMPML बसच्या धडकेत ६ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू





















Join Our Whatsapp Group