पिंपरी (Pclive7.com):- दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टीशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या एका नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी महाराष्ट्रभर मोठी कारवाई हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यातील ६५ ठिकाणी, तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये २३ ठिकाणी एकाचवेळी धडक छापे टाकण्यात आले.

प्राथमिक माहितीनुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून संबंधित नेटवर्क कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप यांसारख्या माध्यमांतून स्थानिक तरुणांशी संपर्क साधून त्यांच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती.

या पार्श्वभूमीवर एटीएसने व्यापक शोधमोहीम राबवत अनेक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कारवाईदरम्यान मोबाईल फोन, लॅपटॉप, बँक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे तसेच इतर काही संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले असल्याचे समजते.

दरम्यान, या नेटवर्कच्या संभाव्य देशविघातक हालचाली, आर्थिक व्यवहार आणि सोशल मीडियावरील संपर्कांची सखोल चौकशी सुरू असून एटीएसकडून पुढील तपास वेगाने करण्यात येत आहे. या कारवाईमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.





















Join Our Whatsapp Group