पिंपरी (Pclive7.com):- मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मोठी प्रशासकीय कारवाई करत पालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. या निर्णयामुळे महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये पर्यावरण प्रमुख संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांचा समावेश आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या चौकशीत संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचे तसेच काही बेकायदेशीर बाबींना परवानगी दिल्याचे प्राथमिक निष्कर्ष समोर आल्याचे सांगितले जात आहे. याच आधारावर आयुक्तांनी ही कठोर कारवाई केली आहे.

मोशी कचरा डेपो दुर्घटनेनंतर प्रशासनाच्या भूमिकेवर विविध स्तरांतून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. त्यानंतर आयुक्तांनी जबाबदारी निश्चित करत ही तडकाफडकी कारवाई केली आहे.





















Join Our Whatsapp Group