रहाटणी (Pclive7.com):- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत रहाटणी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या ‘महा रक्तदान संकल्प शिबिराला’ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन व नगरसेविका सविता खुळे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात मोठ्या संख्येने युवक, महिला आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली.

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. आपत्कालीन परिस्थितीत अनेक रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्ताची गरज भासत असते. ही सामाजिक गरज ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचा संकल्प प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यात आला. शिबिरात प्रथमच रक्तदान करणाऱ्या युवकांनाही मार्गदर्शन करण्यात आले. तसेच रक्तदानाबाबत जनजागृती करून नियमित रक्तदानाचे महत्त्व उपस्थितांना पटवून देण्यात आले.
यावेळी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप, नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, नगरसेविका सविता खुळे, नगरसेवक विनोद नढे, संतोष कलाटे, रहाटणी–पिंपळे सौदागर मंडलाध्यक्ष सोमनाथ तापकीर, काळूराम बारणे, सामाजिक कार्यकर्ते नरेश खुळे, कैलास गोडांबे, भूषण सोंजे, संजय भोसले, राजाभाऊ शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी रक्तदात्यांचे कौतुक करत समाजहितासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक पदाधिकारी, स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. रक्तदात्यांसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा, नोंदणी व्यवस्था आणि आरोग्य तपासणीची उत्तम सोय करण्यात आली होती. त्यामुळे शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांनी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा महा रक्तदान संकल्प शिबिर केवळ वाढदिवस साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता समाजसेवा, मानवता आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संदेश देणारा उपक्रम ठरला. रहाटणी परिसरातील नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला असून भविष्यातही अशाच समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी व्यक्त केला.




















Join Our Whatsapp Group