थेरगाव (Pclive7.com):- श्री. दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, थेरगाव यांच्या वतीने तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका शिवसेना गटनेते नगरसेवक विश्वजीत बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त थेरगाव परिसरातील इयत्ता १० वी व १२ वीच्या २०२६ च्या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

हा समारंभ रविवार, दि.२६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता चिंचवडे लॉन्स, चिंचवड जकात नाका जवळ, चिंचवड येथे होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मराठी चित्रपट व दूरचित्रवाणी क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री पूर्णिमा डे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात थेरगाव परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांच्या यशाचे कौतुक करण्यात येणार आहे.

आयोजकांनी परिसरातील ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता १० वी किंवा १२ वीच्या परीक्षेत ६५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून यश संपादन केले आहे, अशा विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रिका (मार्कलिस्ट) लवकरात लवकर जमा करण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून स्वागत होत आहे.




















Join Our Whatsapp Group