
‘क’ प्रभाग अध्यक्ष निखिल बोऱ्हाडे यांचा पुढाकार; गवळीमाथा, पिंपरी परिसरासह डिफेन्स स्पेसची पाहणी
पिंपरी (Pclive7.com):- मोशी कचरा डेपोवरील वाढता ताण कमी करून शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पर्यायी वेस्ट प्रोसेसिंग प्लॅन्ट उभारणीच्या दृष्टीने विविध जागांची पाहणी करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे ‘क’ प्रभाग (विजयदुर्ग) अध्यक्ष निखिल बोऱ्हाडे यांनी या पाहणीत सक्रिय सहभाग घेत शहराच्या दीर्घकालीन कचरा व्यवस्थापनासाठी पर्यायी उपाययोजनांची आवश्यकता अधोरेखित केली.

मोशी कचरा डेपोवरील कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी गवळीमाथा परिसर, पिंपरी परिसर तसेच संरक्षण विभागाच्या (डिफेन्स) अखत्यारीतील उपलब्ध जागांची पाहणी करण्यात आली. शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार घनकचरा व्यवस्थापनाचे आव्हान अधिक गंभीर होत असून, मोशी डेपोवरील भार कमी करण्यासाठी विकेंद्रित आणि पर्यायी वेस्ट प्रोसेसिंग प्रकल्पांची उभारणी ही काळाची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या पाहणी दौऱ्यात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, क-क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे, आरोग्य विभागाचे सहायक आरोग्य अधिकारी श्री. फल्ले, सुनील नरोटे तसेच वेस्ट प्रोसेसिंग प्लॅन्टशी संबंधित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शहरातील कचरा समस्यांवर प्रभावी तोडगा काढण्यासाठी पर्यायी वेस्ट प्रोसेसिंग प्लॅन्टसाठी संरक्षण विभागाच्या ताब्यातील उपलब्ध जागांचा वापर करता येण्याबाबत सकारात्मक चर्चा करून त्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती निखिल बोऱ्हाडे यांनी दिली. शहराच्या हितासाठी विविध शासकीय विभागांमध्ये समन्वय साधून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

निखिल बोऱ्हाडे म्हणाले की, “मोशी कचरा डेपोचा प्रश्न हा केवळ एका भागापुरता मर्यादित नसून संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराच्या पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित आहे. डेपोवरील ताण कमी करण्यासाठी पर्यायी वेस्ट प्रोसेसिंग प्रकल्प उभारणे अत्यंत आवश्यक आहे. संरक्षण विभागाच्या अखत्यारीतील उपलब्ध जागेबाबत सकारात्मक भूमिका घेत आयुक्तांमार्फत आवश्यक पाठपुरावा करण्यात येणार आहे. शहराच्या भविष्यासाठी शाश्वत आणि वैज्ञानिक घनकचरा व्यवस्थापन व्यवस्था उभी करावी लागणार आहे.
“मोशी कचरा डेपोचा प्रश्न हा केवळ एका परिसराचा नसून, संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराच्या पर्यावरण, नागरिकांचे आरोग्य आणि भावी पिढ्यांच्या सुरक्षिततेशी निगडित आहे. त्यामुळे या प्रश्नावर तात्पुरते नव्हे, तर शाश्वत आणि वैज्ञानिक उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे. आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मोशी कचरा डेपोवरील ताण कमी करण्यासाठी पर्यायी वेस्ट प्रोसेसिंग प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने विविध जागांची पाहणी करण्यात येत असून, संरक्षण विभागाच्या ताब्यातील उपलब्ध जागेबाबतही सकारात्मक चर्चा करून महापालिका आयुक्तांकडे आवश्यक पाठपुरावा करण्यात येणार आहे. शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम, पर्यावरणपूरक आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, भविष्यात मोशीसारखी परिस्थिती निर्माण होणार नाही, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून प्रभावी उपाययोजना राबविण्यास प्राधान्य दिले जाईल.”– निखिल बोऱ्हाडे, अध्यक्ष, ‘क’ प्रभाग (विजयदुर्ग), भारतीय जनता पार्टी.




















Join Our Whatsapp Group