पिंपरी विधानसभेत महत्त्वपूर्ण बैठक; मतदार नोंदणी, बूथस्तरीय नियोजन आणि प्रचारावर भर
पिंपरी (Pclive7.com):- आगामी पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने पिंपरी विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. आमदार प्रसाद लाड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत निवडणुकीचे नियोजन, प्रचाराची रणनीती, मतदार नोंदणी आणि संघटनात्मक बांधणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

या निवडणुकीत पुणे पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉ. सौ. स्मिताताई जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघातील अधिकृत उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन आमदार अमित गोरखे यांनी केले.

बूथस्तरावर सक्रिय होण्याचे आवाहन..
बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार अमित गोरखे यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी बूथस्तरावर प्रभावी नियोजन करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. प्रत्येक पदवीधर आणि शिक्षक मतदारापर्यंत पोहोचून राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती देण्यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले. मतदार नोंदणी वाढवणे, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राखणे आणि प्रचाराची प्रभावी आखणी करणे यासाठी सर्वांनी गांभीर्याने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

या बैठकीस पिंपरी विधानसभा प्रभारी आमदार प्रसाद लाड, सहप्रभारी आमदार स्नेहाताई दुबे, आमदार अमित गोरखे, आमदार उमाताई खापरे, भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे आणि पिंपरी-चिंचवड शिक्षक मतदारसंघ निवडणूक संयोजक सदाशिव खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पक्षाचे सरचिटणीस मोरेश्वर शेंडगे, सोनालीताई हिंगे आणि मधुकर बच्चे, शिक्षक व पदवीधर निवडणूक संयोजक राजेश पिल्ले, तसेच पिंपरी विधानसभा क्षेत्रातील मंडल अध्यक्ष धरम वाघमारे, अनिताताई वाळुंजकर, जयदीप खापरे आणि मंगेश धाडगे यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी, ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवा मोर्चाकडून बैठकीचे आयोजन..
भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष दिनेश यादव, सरचिटणीस राहुल खाडे, प्रदेश सचिव सुमित घाटे, दिनेश काटे, गणेश सस्ते, साची दोशी, प्रसाद कस्पटे, राजेश डोंगरे, अजित कुलथे आणि सम्यक साबळे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.

आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मतदार नोंदणीला गती देणे, संघटनात्मक ताकद वाढवणे आणि प्रभावी प्रचारयंत्रणा उभारणे या प्रमुख मुद्द्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी समन्वयाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.


















Join Our Whatsapp Group