डॉ. स्मिता जाधव आणि प्रा. कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला गती देणार; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांचे मार्गदर्शन
पिंपरी (Pclive7.com):- पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला गती देण्यासाठी सोमवारी (दि. १९ ऑक्टोबर) निगडी-प्राधिकरण येथे पुणे पदवीधर व शिक्षक मतदार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आणि प्रा. कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या प्रचाराची दिशा निश्चित करण्यासह पदवीधर व शिक्षक मतदारांशी संवाद साधण्यात येणार आहे.

निगडी येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात सायंकाळी ४.३० वाजता हा मेळावा होणार आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर आण्णा मोहोळ आणि महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

या मेळाव्यास पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, माजी आमदार विलास लांडे, विधानपरिषद आमदार उमा खापरे आणि अमित गोरखे यांच्यासह महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) या पक्षांचे प्रमुख नेते, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

पदवीधर आणि शिक्षक मतदारांपर्यंत महायुतीची भूमिका पोहोचविणे, निवडणुकीच्या प्रचाराचे नियोजन करणे आणि उमेदवारांच्या प्रचारासाठी सर्व घटकांमध्ये समन्वय साधणे, हा मेळाव्याचा प्रमुख उद्देश आहे. या बैठकीच्या माध्यमातून आगामी निवडणुकीच्या प्रचाराचे नियोजन आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

महायुतीच्या सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच संबंधितांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) अध्यक्ष योगेश मंगलसेन बहल यांनी केले आहे.


















Join Our Whatsapp Group