खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे यांच्यासह सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि मान्यवरांची उपस्थिती
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील लाखो वाचकांच्या पसंतीचे न्यूज पोर्टल म्हणून ओळख निर्माण केलेल्या Pclive7.com – पिंपरी चिंचवड लाईव्ह न्यूज चा ९ वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. काळेवाडी येथील रांगा पॅलेस येथे आयोजित स्नेहमेळाव्याला मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे, चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप, विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि प्रशासकीय, वैद्यकीय, क्रीडा, सामाजिक, पत्रकारिता तसेच कामगार क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

२०१७ मध्ये सुरू झालेल्या Pclive7.com न्यूज पोर्टलने यशस्वीपणे नऊ वर्षांचा प्रवास पूर्ण करून दहाव्या वर्षात पदार्पण केले आहे. या प्रवासात पिंपरी-चिंचवड शहरासह परिसरातील घडामोडी, नागरी समस्या, राजकीय घडामोडी, सामाजिक उपक्रम आणि जनहिताच्या विषयांना व्यासपीठ देत पोर्टलने वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण केले आहे. वाचकांचा विश्वास, जाहिरातदारांचे सहकार्य आणि हितचिंतकांच्या पाठबळामुळे या वाटचालीला बळ मिळाले आहे.

सर्वपक्षीय नेते आणि मान्यवरांची उपस्थिती
या स्नेहमेळाव्याला मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे, नगरसेवक राहुल कलाटे, माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विनोद नढे, स्थायी समितीचे माजी सभापती तथा नगरसेवक नितीन लांडगे, स्थायी समितीचे माजी सभापती विलास मडगिरी, नगरसेवक अमित गावडे, कामगार नेते यशवंत भोसले, भाजपाचे उपाध्यक्ष राम वाकडकर, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे, माजी उपायुक्त दिलीप गावडे, मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे उपस्थित होते.

तसेच नगरसेविका श्रुती वाकडकर, नगरसेविका स्नेहा कलाटे, नगरसेविका प्रियांका कुदळे, माजी नगरसेविका मीनल यादव, गिरिजा कुदळे, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दिनेश यादव, भाजपाचे ज्येष्ठ नेते महेश कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते दत्ता नाना पवळे, गणेश लंगोटे, डॉ. श्याम अहिरराव, राष्ट्रवादीचे युवा नेते प्रवीण पिंजन, काँग्रेस एनएसयूआयचे माजी अध्यक्ष मनोज कांबळे, बांधकाम व्यावसायिक रवी नामदे, व्यावसायिक प्रवीण कुदळे, प्रशांत पाटील, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर जोशी, ॲड. उमेश खंदारे, बांधकाम व्यावसायिक धरमवीर सोनकर, युवा नेते हेमंत डांगे, सागर तापकीर आणि युवराज दाखले यांनी उपस्थिती लावली.

क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
पिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशनचे राजू कोतवाल, दिलीपसिंह मोहिते, औद्योगिक क्रीडा संघटनेचे प्रदीप वाघ, क्रीडा प्रशिक्षक मुकेश पवार यांनी देखील उपस्थिती लावली.

पत्रकारिता, सामाजिक आणि कामगार क्षेत्रातील मान्यवरांचाही सहभाग
ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब जवळकर, जयंत जाधव, गोविंद वाकडे, माधवराव सहस्त्रबुद्धे, कृष्णात कांबळे, विवेक गाडे, संतोष मिश्रा, रोहित आठवले, तुषार झरेकर, अमोल येलमार, मिलिंद कांबळे, उत्तम कुटे, गोपाळ मोटघरे, गणेश दुडम, सुनील कांबळे, गणेश हुंबे, रेवन शिंदे, सूरज कसबे, सुशांत डुंबरे, प्रवीण शिर्के, दत्ता कांबळे, संतलाल यादव, संतोष जाधव, रोहित खर्गे, विशाल जाधव, विकास बोरनळीकर, दिनेश दुधाळे, अमोल शिंत्रे, अविनाश परबत, संतोष जराड, प्रशांत साळुंखे, गौरव साळुंखे, सूरज साळवे, बद्रीनाथ घुगे, देवा भालके, भीमराव बरकडे, दिलीप देहाडे, सचिन सोनवणे, उमेश सनस, विकास साळवे आणि यशवंत नामदे, विजय न्यायाधीश, लीना माने, पूनम पाटील, श्रद्धा प्रभुणे, माधुरी कोराड यांच्यासह अनेक पत्रकार व मान्यवर उपस्थित होते.

याशिवाय सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, दिशा सोशल फाउंडेशनचे माजी अध्यक्ष गोरक्ष भालेकर, संतोष बाबर आणि गुरुदास भोंडवे, प्रसिद्ध व्यावसायिक मोहिते मामा, सुहास ताम्हाणे, शिवाजी घाडगे, कुणाल साठे, व्यावसायिक कुणाल सातव, रवींद्र कदम यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी स्नेहमेळाव्यात उपस्थिती लावली.

विश्वासाच्या बळावर दहाव्या वर्षात पदार्पण
नऊ वर्षांच्या यशस्वी वाटचालीनंतर Pclive7.com ने दहाव्या वर्षात पदार्पण केले असून, आगामी काळातही शहरातील नागरिकांचे प्रश्न, विकासकामे, सामाजिक उपक्रम आणि जनहिताच्या बातम्यांना प्राधान्य देण्याचा संकल्प या निमित्ताने अधोरेखित झाला. विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती आणि शुभेच्छांमुळे वर्धापन दिन सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे यांनी केले. तर Pclive7.com चे संपादक संदेश पुजारी यांनी या यशस्वी प्रवासात सहकार्य करणारे वाचक, जाहिरातदार, हितचिंतक, पत्रकार आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.
(बातमी अपडेट होत आहे..)



















Join Our Whatsapp Group